Wednesday, January 30, 2008

Marathee picture song.. mast na ekdam...

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे ,
का होते बेभान कसे गहिवरते…

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते ,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते …
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते ..

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे ..
का होते बेभान कसे गहिवरते………… …..

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते ,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते ..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते ..

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे ..
का होते बेभान कसे गहिवरते…………

No comments: